सोमवार, १९ मे, २०२५

स्वगत.....

......
आयुष्य एका मीनिटात
नाही बदलविता येत.....
तर ने बदलण्याकरीता,
एका मीनीटात घेतलेला...
'तो' निर्णय कारणीभूत असतो....!

आयुष्य हे सोप्पय नस्तचं मुळी,
तर ते अखंड दगडधोंड्याच्या
काटेरी तारावरच्या बुंध्यावरील
असलेल्या खुब्या सारखं असतं.....!
वळणा वळणावरच.... 
काट्याकुट्यांच आयुष्य..
निसरडं असतं..., 
अन नस्त सुद्धा
पण....
आयुष्य आयुष्यच असतं....
ते कुणाच ही..
अगदी
मोनीका लेवन्स्की .....ते 
आजच्या गोपाल दास महाराजां सारखं...
पण आयुष्य आयुष्यच असतं.....

खरचं आयुष्य,
प्रत्येक क्षणागणिक बदलणारं
प्रवाही...
सतत धावतं....
संथ नस्तच मुळी...,
सारखं खळखळतं....
अगदी तुझ्या हास्या सारखं......
फक्त 'ते'
निकोप,
निस्वार्थ, 
अन निर्भयी राहावं....
बस एवढचं.....
तसही आयुष्य म्हणजे 
दुसरे काय?
दोन गरम स्वासामधील
खुप लांब असं चालणारं...…
अंतर....….......!
शेवटी आपण सर्व अगदी
आतूरतेनं मरणाच्या प्रवासाला
निघालेलें पाथस्थंच  की......!

कुणाचं Destination आधी 
अन कुणाचं नंतर एवढा 
काय तो फरक........


लोग कहते है की....
मौत को देखा तो नहीं...
पर शायद वो (मौत)
बहुत खूबसूरत होंगी...
कम्बखतं जो भी उसे मीलता है.
अपना जीना छोड़ देता है....
(साभार: WA)
..
..
सालं...,
आता हे मधेच कुठनं आठवलं मौत च.....
चांगलं आयुष्यावर बोलत, लिहीत होतो.....
विचार मंथन चालू होते.. अन हे मधीच टपकल
एखाद्या 'शिंके' सारखं......

तर हे असचं...असतं....
कोसलातल्या "पांडुरंग सांगवीकर"
सारखं..…

तर मग हे असचं...
"शेवटी "
आयुष्याच काही एक खरं नाही भावा,
राज्या ......,
ज्याचं त्याचं, 
ज्यानं त्याने..,
ज्याच त्याचं
पाहावं......

इती......
*(अपूर्ण...पुढे कधीतरी पूर्ण करेल या भावनेनं..)

शिरीन"पार्थिव"
अठ्ठावीस एक पंधरा च्या रात्री एक चाळीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा