गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

सैरभैर मन ....

काही वेळा सगळं....

जगच बधीर वाटतं

जगण्यासाठी खुणाच 

गवसत नाही....!

विलक्षण एकटेपणा, 

क्वचित तुटलेपनही,

दिशाहीन जगणं...

(याला Aim less म्हटलं तरी चालेल)

काय करतोय आपण ...?

काय चाललंय आपलं...?

काहीएक कळायला मार्ग नाहीय..........,

आयुष्याचं गणित चुकत आहे बहुतेक........????

ह्या आयुष्याचं आपलं एक बरं असतं... 

ते सतत चालत राहतं, 

थांबायला काहीएक मार्ग नाहीच....

अधांतरी, दिशाहीन, 

संदर्भहीन जगणं......,

कधी कधी मग डोक्याचा पार भुगा होऊन जातो .....

विचाराची मनातील श्रुखंला अखंडीत.... 

त्यातही दिशाहीन,संदर्भग्रस्त, वैचारिक द्वंद्व....मनात ....

सतत अविरत...

ही माझ्या दिशाची होणारी दशा...

काळोख,

काळोख पहाटेपुर्वीचा  गडद काळोख...

आणि मी एकटाच...

(अपूर्ण....)


शिरीन भवरे 

०७/०१/२१

पहाटे ३ वाजता

गुरुवार, ५ एप्रिल, २०१२

" बर्बादाचे जीवन झाले तुझ्या मूळे आबाद ........

  कोटी धन्यवाद तुजला कोटी धन्यवाद.......


 कोटी कोटी च्या नाथा तुझा सदैव जिंदाबाद..

 कोटी धन्यवाद तुजला कोटी धन्यवाद......"


गुरुवार, २२ मार्च, २०१२

"लाख असतील धर्म अमुचे ............ लाख असतील जाती .....
शेवटी ज्यात मिसळायच  ती एकच अमुची माती ....
मराठी असे अमुची मायबोली जरी भिन्न धर्मानुयायी  असू .......
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू ...........
मराठीची  गुढी  उभारू मनामनात ..........
वाजू देउ मराठीचा डंका उभ्या जगात ............"

 
मराठी नववर्ष्याच्या  अगणित  शुभेछेसह 
 
शिरीन भवरे 

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

तुझे अलवार येणे ...............

तुझे अलवार येणे ....
अन निघूनही जाने ......
चंद्र रुपेरी क्षितिजी ..
गातो विरहाचे गाणे...
तुझे अलवार येणे ....
दमछाक काळजात 
तुझ्या रुपेरी केसांचे 
व्हावे हायसे आघात .......
तुझे अलवार येणे .
जसा "प्राजक्त" फुलावा
उगीचच कोंडलेला "स्वास"
जसा फुलारून यावा...

शिरीन... 

रविवार, १५ मे, २०११

दोन फुल एक हाफ

चला आपण एक सहकारी बॅंक काढू या..
पाच पैसे माझे, पाच पैसे तुझे
पाच पैसे याचे, पाच पैसे त्याचे
वीस पैशांत तं राजा अक्खी दुनिया येते
संचालक मंडळ आपलं
आन् मेंबर म्हणून आणखी आठ-दहा ओढू या
चला आपण एक सहकारी बॅंक काढू या..

पैशाचं झाड नसतं म्हणे
आन् पैशाचं बियाणं कृषी केंद्रात मिळंत नाही
जमिनीत पैसे गाडले तरी
जमीन काही फळंत नाही
पण पैशाकडे पैसा जातो
हे आक्शी खरं आहे
एव्हढं आपल्याला माहीत आहे
हे तरी बरं आहे
पैशाचं झाड नसतं
ही कल्पनाच मोडू या
चला आपण एक सहकारी बॅंक काढू या..


मार कुदळ, खोद खड्डा
आन् ही बॅंक हाच आता आपला अड्डा
डुकराच्या पाठींना भोकं पाडून
किती पैसे जमतील राजा
सरकारच्या तिजोरीला तडा जाईल
तेव्हा खरी मजा
आपणच देणारे, आपणच घेणारे
आपणच बुडवणारे
आन् आपणच माफ करणारे
हातात हात घेऊन
एक.दोन..तीन..दौडू या
चला आपण एक सहकारी बॅंक काढू या..

मी दादा, तू तात्या
हे रावसाहेब, हे अण्णा
तात्या, धोतराचा सोगा नीट धरा
अण्णा, टोपीचा अ‍ॅंगल नीट करा
रावसाहेब, जॅकेट कधीचं आहे?
जाम आखूड झालं की राव
बरं चला,
डावा तळहात जाम खाजवतो आहे
कानात नोटांची सळसळ वाजवतो आहे
महाराजांचे नाव घेऊन
व्यवहारे धन जोडू या
चला आपण एक सहकारी बॅंक काढू या..

यांचा साखर कारखाना..
भाव पडले
गाडे अडले
ऊस घेतला तोही अंगावर पडला
सगळा हंगामच यांना नडला
तात्या यांना आपण
चार-दोन कोटी देऊ
मी हमी देतो
तुम्ही सही करा
अण्णा, चार महिन्यांनी यांना कर्ज माफ करा
आपणच आपली कदर नाही केली तं
आपला उपयोग काय?
बाकीचे उगा घालतील फाटक्यात पाय
पण आधी जरा तेव्हढं देण्या-घेण्याचं बोलू या
चला आपण एक सहकारी बॅंक काढू या..

कर्जाला काय काय लागतं बोला,
तारण?
आता मी बसलो इथं एव्हढा,
कसलं तारण आन् कसलं मारण म्हणता
आणखी काय लागतं?
आर्ज?
कर्ज मिळू द्या की, आर्ज कुठं पळून जातो व्हंय?
साक्षीदार!
आता व्हा का तुमीच,
आपली वळख काय आजची व्हंय?
माजा चुलता आन् तुमचा बाप यकाच कालेजात होते
बरं पक्कं  का मंग?
तुमचा हिस्सा मी इसरणार व्हंय?
तर, असे विश्वासू कर्जदार शोधू या
चला आपण एक सहकारी बॅंक काढू या..

सहकार म्हणजे फार मोठं काम असतं
सरकार आन् सहकार यात फरक फक्त ‘ह’ चा
‘हं’ म्हटलं की सगळं कळलं पाहिजे
तर सहकारकडून सरकारकडं जाता येतं
बिना सहकार नाही सरकार म्हणतात ते काय उगीच?
ते आडिट बिडिटचं काय झेंगट असतं
ते मात्र नीट समजून घ्या
एकदा बॅंक चालू झाली की मग सपासप पैसा आला पाहिजे
आन् हे बघा, इमोशनल व्हायचं नाही,
उद्या बॅंक बुडालीच, तर गावात भिंती भिंतीवर
लिहून टाकायचं,
‘ठेवीचा रोगी कळवा
आन् लोकांचा जीव जळवा’..द्या टाळी!
आधी पेप्रात एक मस्त बातमी सोडू या..
चला आपण एक सहकारी बॅंक काढू या..

एक दुरुस्ती केली पायजेल गडय़ा
‘पाच पैसे याचे, पाच पैसे त्याचे’ हे ठीक आहे,
त्यात, माझे आणि तुझे पाच पाच हवेत कशाला?
तर, आधी आपले आपण वळते करून घेऊ या
आणि आता..चला आपण एक सहकारी बॅंक काढू या..


लोकसत्तातून साभार दि १५/५/२०११ लोकरंग